Ladki Bahin Yojana March Installment Date Maharashtra: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य शासनाने फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या एकूण 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता एकत्रित देण्याचा निर्धार घेतला होता, पण लाडकी बहिण योजनेत पात्र झालेल्या महिलांना फक्त फेब्रुवारी महिन्याच्या आठवा 1500 रुपये च्या हप्ता मानधन मिळाल्याने लाभार्थी महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Ladki Bahin Yojana March Installment Date Maharashtra
तसेच विरोधकांनी फसवणूक केल्याचे आरोप देखील शासनावर केलेला आहे, अशातच महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी या सर्व प्रश्नांची उत्तर देत सोशल मीडियावर मोठी अपडेट दिली आहे, तर बघूया लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याच्या नववा 1500 रुपये हप्ता बद्दल मोठी अपडेट सविस्तरपणे.
3000 रुपये हप्त्याच काय झालं | Ladki Bahin Yojana 3000 Hafta News
माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत शासनाने महिला दिनाच्या औचित्य साधून फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या हप्ता एकत्रित 3000 तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली होती.
यातच महिला दिनापासून लाभार्थी महिलांना मानधन येण्यास सुरुवात झाली पण 3000 तीन हजार मानधन नसून फक्त 1500 पंधराशे रुपये हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्या जमा करण्यात आला याबद्दल महिलांनी नाराजीचा सूर उमटला आहे.
3000 रुपये म्हणून फक्त पंधराशे रुपये हप्ता दिल्याबद्दल लाभार्थी महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे, विरोधकांनी फसवणूक केल्याच्या आरोप केला आहे याबद्दल महिला बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी सोशल मीडिया साइटवर सांगितले की लाडक्या बहिणींना मार्च व फेब्रुवारी महिन्याच्या एकूण 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता एकत्रित मिळणार आहे.
तसेच ही प्रक्रिया 12 मार्चपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांना 3000 तीन हजार रुपयांचे हप्ता त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येण्याची ग्वाही दिली.
2100 रुपये हप्ता कधी मिळणार | Ladki Bahini Yojana 2100 Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुतीने निवडणुकीदरम्यान घोषणा केली होती की सत्ता स्थापनेनंतर लाडकी बहीण योजनेचा 1500 पंधराशे रुपयांच्या हप्ता 2100 रुपये करण्यात येईल.
याबद्दल प्रसार माध्यमांनी अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारल्यास त्यांनी सांगितले की मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात शासन याबद्दल सकारात्मक विचार करेल तसेच मुख्यमंत्री पण याबद्दल सकारात्मक विचार करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
Ladki Bahin Yojana Latest News
राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली आहे या योजनेमुळे राज्यातील महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत बंपर बहुमत मिळाले होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती ने घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेच्या हप्ता 1500 रुपये वरून 2100 रुपये करण्यात येणार आहे.